भूम (प्रतिनिधी)-शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे संघटनात्मक बांधणी आणि दुष्काळग्रस्तांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करून दुष्काळाच्या संकटाने त्रस्त असलेल्या शेतकरी, कष्टकरी आणि सामान्य जनतेच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. आसे आवाहन धाराशिव लोकसभा संपर्क प्रमुख सुनिल काटमोरे यांनी म्हटले आहे
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याच्या आदेशावरून नुकतीच लोकसभा संपर्क प्रमुख म्हणून सुनिल काटमोरे यांची निवड झाली असून त्यांनी लगेच धाराशिव लोकसभा मतदार संघातील प्रत्येक विधानसभा मतदार संघामध्ये पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याबरोबर बैठक घेऊन संघटनात्मक आढावा व दुष्काळी परिस्थिती वर मात करण्यासाठी उपयोजने संदर्भात मार्गदर्शन केले. पाणीटंचाई, पिकांचे नुकसान आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी शासनाचे लक्ष वेधणे आवश्यक आहे. त्याचबरोबर पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी, गावागावात पदाधिकारी व शिवसैनिकांशी संवाद साधत संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
दुष्काळग्रस्तांच्या हक्कासाठी आवाज बुलंद करूया!
संघटना मजबूत करूया, जनतेच्या प्रश्नांसाठी एकजुटीने उभे राहूपुढे बोलताना म्हणाले कि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना गद्दारी करणाऱ्यांना इतिहास कधीच विसरत नाही. शिवसेना ही केवळ सत्ता किंवा पदासाठी उभी राहिलेली संघटना नाही; ती निष्ठावंत शिवसैनिकांच्या संघर्षातून उभी राहिलेली विचारांची चळवळ आहे. पद, सत्ता किंवा स्वार्थासाठी पक्षाच्या विचारांशी आणि कार्यकर्त्यांच्या विश्वासाशी तडजोड करणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी
पद येतात आणि जातात, पण निष्ठा आणि विचार कायम राहतात. अडचणीच्या काळात पक्षासोबत ठामपणे उभे राहणारा खरा शिवसैनिक असतो. संकटाच्या काळात सोबत सोडून स्वार्थासाठी दुसरी वाट धरणे म्हणजे कार्यकर्त्यांच्या विश्वासाला तडा देणे.
आज गरज आहे ती गटबाजीची नाही, तर एकजुटीची! गरज आहे पदासाठी स्पर्धेची नाही, तर संघटन मजबूत करण्याची! आणि गरज आहे स्वार्थाची नाही, तर पक्षाच्या विचारांशी प्रामाणिक राहण्याची! शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) निष्ठावंत शिवसैनिकांच्या ताकदीवर संघटन अधिक मजबूत करूया
लोकसभा मतदार संघामध्ये शिवसेना शेतकरी मदत केंद्र शेतकऱ्यांच्या हक्कासाठी, मदतीसाठी आणि मार्गदर्शनासाठी उभी करण्याचे काम चालु आहेते सगळी कडे उभे करावीत, अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट आणि नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी अडचणीत सापडतो. अशा वेळी पीकविमा, नुकसानभरपाई, कर्जमाफी व शासनाच्या विविध कृषी योजनांबाबत योग्य माहिती आणि मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे. शेतकरी केद्रामध्ये पीकविमा पीकविमा अर्ज, नुकसान नोंदणी, विमा दाव्याची प्रक्रिया व आवश्यक कागदपत्रांबाबत मार्गदर्शन. शेतकरी कर्जमाफी शासनाच्या कर्जमाफीसंबंधी उपलब्ध योजना, पात्रता व प्रक्रियेबाबत माहिती.नुकसानभरपाई व शासकीय मदत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पीक नुकसानीसाठी उपलब्ध शासकीय मदतीची माहिती शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मदतीचा हात शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन संबंधित विभागाकडे पाठपुरावा करण्यासाठी मदत. शेतकरी सक्षम झाला तरच गाव, तालुका आणि महाराष्ट्र सक्षम होईल आसे धाराशिव लाकसभा संपर्क प्रमुख सुनिल काटमोरे यांनी म्हटले आहे. यावेळी धाराशिव जिल्हाप्रमुख रणजित पाटील 'महिला जिल्हा प्रमुख जिन्नत सय्यद 'विधानसभा प्रमुख प्रल्हाद आडागळे 'कृषी बाजार समीती जैन मालक ' शहरप्रमुख रहिस मुजावर ,बुददीवान लटके, कोहीनुर सय्यद ,उमेश परदेशी अंकुश माधव , अभय पाटील याच्यासह नगरसेवक व इतर पदाधिकारी उपस्थित होते
