परंडा (प्रतिनिधी)- भारतीय जनता पक्षाचे पूर्व प्रदेश सहसंघटन मंत्री, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष व विधानपरिषदेचे सदस्य आमदार सुनिलजी कर्जतकर यांनी परंडा येथे भाजपा संपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली असता त्यांचा भाजपा नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

यावेळी भाजपा परंडा तालुका अध्यक्ष अरविंदबप्पा रगडे, शहराध्यक्ष उमाकांत गोरे, जिल्हा सरचिटणीस ॲड. गणेशबप्पा खरसडे, माजी उपनगराध्यक्ष सुबोधसिंह ठाकूर, उपनगराध्यक्ष समरजीतसिंह ठाकूर, भाजयुमो शहराध्यक्ष व नगरसेवक अविनाश विधाते, नगरसेवक अकिब पठाण, धनाजी गायकवाड, ॲड. ॲड.भालचंद्र औसरे, बाबासाहेब जाधव, रामदास गुडे, सारंग घोगरे, ॲड. तानाजी वाघमारे, रामकृष्ण घोडके, मनोज पवार, धनंजय काळे, संतोष गायकवाड, यशपाल बनसोडे, तानाजी घोडके, गौरव पाटील, अजिमभाई हन्नूरे, अप्पा मदने, व्यंकटेश दिक्षीत आदी पदाधिकारी व कार्यर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

आमदार  सुनिलजी कर्जतकर हे पक्ष संघटनेत समर्पितपणे चाळीस वर्षाहून अधिक काळापासून पूर्णवेळ कार्यरत असून त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पक्षाचा विचार आणि काम रुजवण्याचे कार्य केले आहे. तसेच त्यांनी आणीबाणीच्या काळात दीड वर्षाचा कारावासही भोगला असून भाजपाचे पक्ष संघटन मजबूत करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. 

मा.आ.ठाकूर व कर्जतकर यांचा गेली चाळीस वर्षापासूनचा त्यांचा स्नेह असून माजी आमदार ठाकूर यांना त्यांच्या बरोबर पक्ष संघटनेत दीर्घकाळ काम करण्याची संधी मिळाली. या भेटीत जुन्या अनेक आठवणींना उजाळा मिळाला.


 
Top