धाराशिव (प्रतिनिधी)- हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन तसेच शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत धाराशिव लोकसभा मतदारसंघातील विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

यावेळी अखिल भारतीय श्रमिक महासंघ, महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी व सदस्य तसेच धाराशिव जिल्ह्यातील विविध भागांतील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. अखिल भारतीय श्रमिक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आनंद अंकुश भालेराव (प्रदेश सचिव, महाराष्ट्र राज्य कामगार आघाडी, भाजपा तथा अखिल भारतीय श्रमिक महासंघ), नंदकुमार मनाळे (उपाध्यक्ष), सुहास साका (सचिव), रवी पवार (खजिनदार), राजाराम चंदनशिवे (मराठवाडा संघटक), राजेश सय्यद (जिल्हाध्यक्ष), अशोक नाईकनवरे व बाळासाहेब माळी (जिल्हा उपाध्यक्ष), संतोष यादव (तालुकाध्यक्ष), बबन चव्हाण (प्रमुख पदाधिकारी), आशाताई बनसोडे (सोलापूर जिल्हाध्यक्ष), बाळासाहेब तुपसुंदर, अविनाश कांबळे आणि किरणकुमार आवटे यांचा समावेश होता. तसेच तुळजापूर तालुक्यातील शहापूर जिल्हा परिषद गटातील अझरभाई मुजावर (माजी जिल्हा परिषद सदस्य, काँग्रेस), शंकर अविनाश जमादार (सरपंच, निलेगाव), गणेश लक्ष्मण कांबळे (माजी उपसरपंच, केशेगाव), मेहबूब फकीर (ग्रामपंचायत सदस्य, केशेगाव), शिवशंकर हादरे, हारूनभाई शेख, दादा भोपळे, अफसर शेख, रामराजे पाटील, सतीश बागडे, दयानंद गायकवाड (माजी सरपंच, इटकळ) आणि युनूस मकानदार यांनीही शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे शिवसेना परिवारात स्वागत करून त्यांच्या पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या पक्षप्रवेशामुळे धाराशिव लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या संघटनात्मक कार्यात नव्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सहभाग वाढणार असून, स्थानिक पातळीवरील संघटनात्मक बांधणीला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी ऋषिकेश मगर, सोमनाथ गुरव, सुजित हंगरकर, प्रतीक रोचकरी, सह्याद्री राजेनिंबाळकर, विश्वजीत गुरव, शंकर सूर्यवंशी, मालोजी सूर्यवंशी, गफूर शेख आदी मान्यवर उपस्थित होते.


 
Top