कळंब (प्रतिनिधी)- 31 ऑक्टोबर 2005 रोजी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनच्या भवितव्याशी निगडित असलेला शासन निर्णय अन्यायकारक असल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना तालुका शाखा कळंब यांच्या वतीने 2 नोव्हेंबर 2026 रोजी कळंब तालुक्यातील सर्व शासकीय व अशासकीय कार्यालयामध्ये काळ्या फिती लावून सदर शासन निर्णयाचा निषेध व्यक्त करण्यात येणार आहे. अशा आशयाचे निवेदन तहसीलदार कळंब यांना महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना तालुका शाखा कळंब यांच्या वतीने देण्यात आले आहे.
2 नोव्हेंबर 2026 रोजी कळंब तालुक्यातील सर्व विभागातील कार्यालयात काळ्या फिती लावून सर्व कर्मचारी निषेध व्यक्त करणार आहेत. निवेदनावर महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे तालुकाध्यक्ष नारायण बाकले, जिल्हा मुख्य संघटक प्रशांत घुटे, कार्याध्यक्ष सुनील बोरकर, कोषाध्यक्ष दशरथ नथाडे, सरचिटणीस महादेव मेनकुदळे, अविनाश खरडकर,पठाण वाय.डब्ल्यू.,पवळ एस.के.प्रदीप सर्जे आदींच्या स्वाक्षरी आहेत.
