ढोकी (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील ढोकी गावातील दारूविक्री, मटका आणि जुगार यांसारखे अवैध धंदे तात्काळ बंद करावेत, अशी मागणी ढोकी ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत ग्रामस्थांनी शुक्रवारी दि.04 सप्टेंबर रोजी ढोकी ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यात एकत्र येऊन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हजार यांच्या कडे निवेदन देऊन केली.
ढोकी गावात अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्याचा ग्रामपंचायत च्या ग्रामसभेचा ठराव ग्रामस्थांच्या बैठकीत एकमताने करण्यात आला होता. मात्र, या ठरावानंतरही गावात दारूविक्री, मटका आणि जुगार सुरूच असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. निवेदन असे म्हटले की, मौजे ढोकी गावांतील सर्व अवैद्य धंदयाचा (गांजा, चरस, मकडी, इतर जुगाराचे अड्डे) यांचा सुळसुळाट चालू झालेले आहेत. या अवैद्य धंदयामुळे गावातील तरुण पिढी, मजूर वर्ग व नागरीक या वितुष्टीत लोकांच्या रोजच्या भांडण तंटामुळे गावांतील शांतता व सुव्यवस्थेला धोका निर्माण झाला असून महिला व मुलींना रस्त्याने ये-जा करतांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक कुंटुंबे या जुगार व दारुमुळे उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. गावांत कायदा व सुव्यवस्था अबादीत रहावी आणि गावांतील नागरीकांचे आरोग्य सुरक्षीत रहावे. यासाठी हे सर्व अवैध धंदे तात्काळ बंद करणे अत्यंत गरजेचे आहे.
प्रशासनाने या निवेदनाची गंभिर दखल घेऊन ढोकी गावांतील सर्व प्रकारच्या दारुच्या बेकायदेशीर भट्या दारु विक्रीचे ठिकाणे तसेच जुगाराचे अड्ड्यावर कडक कायदेशीर कार्यवाही करावी.असे नमुद करण्यात आले आहे. जर येत्या तीन दिवसांत योग्य ती कठोर कार्यवाही झाली नाही तर ग्रामपंचायत ढोकी व सर्व ग्रामस्थांच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र अंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. मोठया प्रमाणात अवैद्य धंदेमध्ये साधारण डुप्लीकेट विदेशी दारु, पावडरची शिंदी, मकडी जुगार व अवेद्य सावकारकी यांचा मोरक्या नाना कल्लाप्पा चव्हाण व आबा आप्पा चव्हाण हे आहेत. यांच्यावर कडक कार्यवाही करावी.असे निवेदन मध्ये नमुद करण्यात आले आहे. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव आणि जिल्हा पोलीस अधीक्षक ,उप अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, निरिक्षक अन्न भेसळ यांच्याकडेही देण्यात आल्या आहेत.
यावेळी उपसरपंच अमोल समुद्रे, जिल्हा मजूर फेडरेशन चे माजी चेअरमन गफार काझी,पंचायत समितीचे माजी सदस्य संग्राम देशमुख,भाजपचे तालुकाध्यक्ष प्रमोद देशमुख,आरेफ काझी,दौलत गाढवे, अर्शद काझी,राजपाल देशमुख,दगडू धावारे,पोलीस पाटील राहुल वाकुरे,सलीम काझी,एडवोकेट तुकाराम शिंदे,भाजपचे शहराध्यक्ष गुणवंत सुतार,पंकज देशपांडे,अरुण डोलारे अरुण देशमुख,अजित देशमुख यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.