तुळजापूर (प्रतिनिधी)- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवाली सराटी येथे उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या न्याय्य मागण्या मान्य करून त्यांचे उपोषण तातडीने सोडवावे, अशी मागणी एआयएमआयएमचे माजी जिल्हाध्यक्ष सिद्विक इब्राहिम उर्फ गोलाभाई यांनी केली आहे.

मराठा समाजातील तरुणांच्या शिक्षण, नोकरी आणि भवितव्याचा प्रश्न गंभीर असून, सरकारने या विषयाकडे संवेदनशीलतेने पाहून संवैधानिक व कायदेशीर चौकटीत कायमस्वरूपी तोडगा काढावा, असे त्यांनी म्हटले आहे.

ओबीसी समाजाच्या विद्यमान आरक्षणाला धक्का न लावता, जुन्या नोंदींमध्ये कुणबी, मराठा-कुणबी किंवा कुणबी-मराठा अशा नोंदी असलेल्या पात्र व्यक्तींना कायद्यानुसार प्रमाणपत्र व आरक्षणाचा लाभ मिळावा, अशी भूमिकाही त्यांनी मांडली. “मराठा समाजाला न्याय मिळावा, मात्र त्यासाठी ओबीसींच्या हक्कांवर अन्याय होऊ नये. दोन्ही समाजांचे हक्क अबाधित ठेवून सामाजिक सलोखा कायम राखणारा निर्णय सरकारने घ्यावा,” अशी मागणी सिद्विक इब्राहिम उर्फ गोलाभाई यांनी केली आहे.

 
Top