भूम (प्रतिनिधी)-  महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ तालुका भूमच्या वतीने तालुक्यातील नऊ शिक्षकांना संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे भूम तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी अनिता जगदाळे,संघाचे राज्य उपाध्यक्ष सोमनाथ टकले,गटशिक्षण कार्यालयाचे शिक्षण विस्ताराधिकारी श्री सूर्यकांत साळुंखे, संघाचे विभागीय कार्याध्यक्ष अर्जुन गुंजाळ, साने गुरुजी शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन देवराम, तालुकाध्यक्ष संजीवन तांबे यांचे उपस्थितीत शिक्षक रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा भूम येथे संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्रीमान बाळकृष्ण तांबारे यांचे वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरात तालुक्यातून उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना शिक्षक रत्न पुरस्कार देण्यात आला. ज्या शिक्षकांचं काम तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतं,अतिशय उत्कृष्ट काम करत असतात परंतु शासकीय पुरस्कारासाठी ते स्वतःहून प्रस्ताव सादर करत नाहीत असे शिक्षक या सन्मानापासून वंचित राहू नयेत म्हणून शिक्षक संघाच्या तालुका शाखेने प्रत्येक केंद्रातून एका शिक्षकाला शिक्षक रत्न पुरस्कार देण्याची परंपरा सुरू केली.

*याप्रसंगी श्रीमती जयश्री शंकर गायकवाड प्राथमिक शाळा भवानवाडी, श्रीमती मंगल चंद्रभान कुटे प्राथमिक शाळा आनंदनगर, रामचंद्र गोरे प्राथमिक शाळा बेलगाव, श्रीमती सविता विठ्ठल गिरी प्राथमिक शाळा डोकेवाडी, श्रीमती अर्चना केशव कापसे प्राथमिक शाळा तिंत्रज,श्री शिवप्रसाद बाबू स्वामी प्राथमिक शाळा दुधोडी, श्री तात्या मारुती ढोरे प्राथमिक शाळा आरसोली, श्री दत्ता शिवाजी घोडके प्राथमिक शाळा अंधारे वस्ती माणकेश्वर, श्री अण्णासाहेब मुरलीधर चव्हाण प्राथमिक शाळा जोतिबाची वाडी नऊ केंद्रातून या नऊ शिक्षकांना शिक्षक रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनासाठी रामेश्वर शिंदे,मनोहर गजरे,हरिभाऊ साळुंखे, सोमनाथ तौर,दत्तात्रय घुले अंगद मिसाळ, अण्णा मोटे, गोकुळ आरेकर, सुरेश घुले, अच्युत मुळे,शहाजी पंडित,लक्ष्मी इंगळे,वंदना राऊत,अनुराधा भोसले, स्मिता जंजिरे, काका डोरले, श्रीपाद कुंभार, श्रीराम हंगे, रणजीत तावरे, सुनील गुंजाळ,समीना बागवान राजूबाई गोपाळघरे यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्याध्यक्ष दीपक वाळके यांनी केले तर आभार प्रदर्शन सरचिटणीस श्री दत्ता गुंजाळ यांनी केले.

 
Top