धाराशिव (प्रतिनिधी)-  शिक्षक राष्ट्राला अभिप्रेत असणारा विज्ञाननिष्ठ समाज घडवत आहेत असे प्रतिपादन डॉ. वैशाली बोबडे यांनी केले. येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात शिक्षक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.यावेळी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य डॉ ए के मंजुळकर यांच्या हस्ते संपन्न झाले.

डॉ. वैशाली बोबडे पुढे म्हणाल्या की, डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी भारतीय विचार परंपरा आणि पाश्चात्त्य तत्त्वज्ञान यांच्यात संवाद घडवून आणला. 

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ मंजुळकर म्हणाले की, शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थी पुढे येणे गरजेचे आहे. यानिमित्ताने विद्यार्थ्यांना भविष्याचा वेध घेता येईल. शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे विद्यार्थी होऊन एक दिवस त्यांच्याकडुनच ज्ञान गृहण करावे. जेणेकरून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढीस लागेल असे मार्गदर्शन  केले. कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. उगिले यांनी केले. तर आभार प्रा.घुले यांनी मानले.

 
Top