येरमाळा (प्रतिनिधी)- 1 जानेवारी 2026 रोजी वयाची 65 वर्षे पूर्ण झालेल्या तसेच 1 जून 2026 पर्यंत सभासद नोंदणी केलेल्या पात्र सभासदांना दहा हजार रुपये सन्मान निधीचा लाभ मंजूर करण्यात आलेला आहे.
कल्याण धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळाच्या सन्मान निधी योजनेअंतर्गत सदस्य तयार करण्यात कल्याणच्या आरटीओ कार्यालयाचा राज्यात दुसरा क्रमांक आला आहे. कल्याण आरटीओचे अधिकारी आशुतोष बारकूल यांचा सत्कार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.या प्रसंगी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे देखील उपस्थित होते.
1 जानेवारी 2026 रोजी वयाची 65 वर्षे पूर्ण झालेल्या तसेच 1 जून 2026 पर्यंत सभासद नोंदणी केलेल्या पात्र सभासदांना दहा हजार रुपये सन्मान निधीचा लाभ मंजूर करण्यात आलेला आहे.
सन्मान निधीचा धनादेश वितरण कार्यक्रम गुरुवारी ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये पार पडला. कल्याण आरटीओ कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात एकूण 5 हजार 800 वाहन धारक यांनी धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळाचे सभासदत्व स्वीकारले आहे. कल्याण आरटीओ कार्यालयाचा जास्तीत जास्त सभासद करुन राज्यात दुसऱ्या नंबरवर येण्याचा बहुमान प्राप्त झालेला आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते कल्याण आरटीओचे अधिकारी येरमाळा गावचे भूमीपुत्र आशुतोष नरहरी बारकुल यांचा सत्कार करण्यात आलेला आहे.त्यानी कल्याण कार्यालयाच्या पूर्वी,नागपूर ग्रामीण,लातुर येथे असताना अंबाजोगाई (जि.बीड),येथे अतिरिक्त आरटीओ म्हणुन सेवा बजावल्या नंतर त्यांची कल्याण येथे नेमणूक झाली आहे.
5 हजार 800 सभासदांपैकी 251 सभासद ज्यांची वयाची 65 वर्षे पूर्ण झाली आहेत अशा वाहनधारकांना सन्मान निधी योजनेमार्फत दहा हजार रुपये सन्मान निधीचा लाभमंजूर करण्यात आला आहे.
