तुळजापूर (प्रतिनिधी)- शिक्षक दिनाचे औचित्य साधून लोकमंगल मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी, शाखा तुळजापूर येथे तुळजापूर शहर व परिसरातील गुणवंत व जेष्ठ शिक्षकांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात तुळजापूर तालुक्यातील विविध शाळांमधील शिक्षकांचा लोकमंगल मल्टीस्टेटच्या वतीने शाल, पुष्पगुच्छ, पेन व सन्मानचिन्ह देऊन विशेष गौरव करण्यात आला.

सत्कारमूर्ती शिक्षक

इसाक पटेल तालुका क्रीडा समन्वयक, तुळजापूर, हुंडेकरी सतीश दिगंबरराव कला शिक्षक शिंदे हायस्कूल, आदटराव लालासाहेब लिंबराज क्रीडा शिक्षक, शिंदे हायस्कूल, क्षीरसागर किसन तुकाराम शिंदे हायस्कूल, गायकवाड राजू जिल्हा परिषद शाळा मोरडा, साळवे शिंदे हायस्कूल, हुंडेकरी डी. डी. शिंदे हायस्कूल, पुरी अमृतवाडी, सुरेश राऊत मसला खुर्द, सुरवसे जिल्हा परिषद शाळा, सारोळा, गणेश अंबादास जळके नरेंद्र आर्य विद्यालय, अपसिंगा, बापूसाहेब कदम कन्या प्रशाला, तुळजापूर, 

यावेळी लोकमंगल मल्टीस्टेटचे संचालक मसचिन अडगळे यांनी उपस्थितांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच शाखेतील कर्मचाऱ्यांनी लोकमंगल समूहाची कार्यप्रणाली, विविध ठेव योजना, आणि 'आई योजना' व विविध महामंडळांच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या कर्जांविषयी सविस्तर माहिती दिली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाखाधिकारी राजकुमार पवार, धनंजय कदम, विनोद देवकर, सुनील साळुंखे, काका माने, फजल सिद्धकी, रोशनी सोनवणे व खंडेराव देवकर यांनी विशेष परिश्रम घेतले. या प्रसंगी शाखेचे ग्राहक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top