मुरुम (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, कंटेकुर येथे आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची 235 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, शौर्य आणि स्वाभिमानाची भावना जागृत करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन राम कलबुर्गे व आप्पाराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मीकांत पटणे सर यांनी विद्यार्थ्यांना राजे उमाजी नाईक यांच्या जीवनकार्याबद्दल सखोल मार्गदर्शन केले. अन्यायाविरुद्ध लढण्याची त्यांची जिद्द, स्वाभिमान आणि देशप्रेम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच उमाजी नाईक यांचे विचार आपल्या आचरणात आणावेत, असा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मीकांत पटणे सर, कलशेट्टी सर, नदाफ सर, सूर्यवंशी सर, पाटील मॅडम, शिकारे मॅडम दिगंबर दासे, रुक्मिणी जमादार, राम कलबुर्गे, उमेश जमादार, व्यंकट घोटाळे, प्रशांत गुरव, कृष्णा घोटाळे, आप्पाराव पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या शौर्य व क्रांतिकारी विचारांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रेरणादायी जीवनकार्याची माहिती मिळाली.
