धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव येथील एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यशाळेतील कार्यालयीन अधीक्षक सुनिल हुंडेकर 31 डिसेंबर रोजी निवृत्त होत आहेत. गेल्या अनेक वर्षात कर्तव्यनिष्ठेने काम करणारे सुनिल दिगंबरराव हुंडेकर यांच्या निवृत्तीमुळे विभागीय कार्यशाळेत त्यांची उणीव निश्चित जाणवले असे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार राजाभाऊ वैद्य यांनी केले.

सिध्दाई येथे झालेल्या छोट्याखानी कार्यक्रमात सुनिल हुंडेकर यांच्या निवृत्तीबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी दिगंबरराव हुंडेकर, डॉ. यशवंत पेठकर, अमित माकणे, सतिश हुंडेकर, अशोक हुंडेकर, गजानन वैद्य, निळील हुंडेकर, अश्विन माकणे, कैलास माकणे, विलास माकणे, पवन नरवडे  आदी परिवारासह उपस्थित होते. यावेळी बोलताना दिंगबरराव हुंडेकर यांनी आपण आपल्या जीवनात काही कमवले नसलेतरी मुलांना चांगले संस्कार देवून घडवले आहे असे सांगितले. कार्यक्रमाची सुरूवात करताना सुनिल हुंडेकर यांची कन्या रितू हुंडेकर हिने नोकरीत असताना ज्या प्रमाणे पप्पांनी शिस्त, वेळ पाळली. त्याप्रमाणेच घरीपण त्याच पध्दतीने वागले. बाहेर फिरायला जाण्यासाठी सुट्टी घ्या अशी मागणी केली असता पप्पांनी कधीही रजा शिल्लक नाही, सुट्टी घेता येत नाही असे सांगितले. परंतु आज समजले की पप्पांची रजा 100 दिवसाची शिल्लक होती. आई-वडिलांनी आमच्यावर जे संस्कार केले. त्यामुळेच आज बाहेर आम्हाला सन्मान मिळतो असे रितू हुंडेकर यांनी सांगितले. तर अशोक हुंडेकर यांनी सुनिल हुंडेकर विषयी बोलताना भावनिक होवून जुन्या आठवणी सांगितल्या. डॉ. यशवंत पेठकर यांनीही सुनिल हुंडेकर यांच्या संदर्भात गौरवद्गार काढले. तर अमित माकणे यांनी सुनिल हुंडेकर यांच्याविषयी ते आमचे मेव्हणे जरी असले तरी नेहमीच आपुलकीच्या भावनेतून ते वागले. 


Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top