तुळजापूर (प्रतिनिधी)- श्रावणमासनिमित्त श्रीक्षेत्र तुळजापूर येथे अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, शिवलिलामृत पारायण तसेच श्रीमद्‌‍ देवी भागवत कथा सोहळ्याचा बुधवारी (दि. 19) भक्तिमय वातावरणात शुभारंभ झाला. विविध धार्मिक विधी आणि पूजनाने या सोहळ्याला प्रारंभ करण्यात आला.

सकाळच्या सत्रात वीणा पूजन श्री. व सौ. भक्ती शेखर गंगणे यांच्या हस्ते, पेटी पूजन श्री. व सौ. रोहिणी ज्ञानेश्वर क्षीरसागर यांच्या हस्ते, तर मृदंग पूजन श्री. व सौ. मंजुषा प्रविण कदम यांच्या हस्ते करण्यात आले.

तसेच ध्वज पूजन श्री. व सौ. अहिल्या सोमनाथ अमृतराव, कलश पूजन श्री. व सौ. आरती विक्रम कदम (उदाजी), ग्रंथ पूजन श्री. व सौ. वैभवी सागर कदम, टाळ पूजन श्री. व सौ. अंबिका उत्तरेश्वर रोचकरी, गाथा पूजन श्री. व सौ. सावित्री बालाजी सोजी, तुळशी पूजन श्री. व सौ. किरण पुष्कराज शिंदे आणि गोमाता पूजन श्री. व सौ. कंचन शंतनु गगणे यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर सायंकाळच्या सत्रात ह.भ.प. संतोष महाराज पायगुडे (पुणे) यांचे सुश्राव्य कीर्तन संपन्न झाले. त्यांच्या कीर्तनाला भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


 
Top