धाराशिव (प्रतिनिधी)-  श्री बाल हनुमान गणेश मंडळाच्या  वतीने अमरावती येथील 70 वारकऱ्यांचे स्वागत गवळी गल्ली गणेश मंडळाच्या वतीने करण्यात आले. अमरावती जिल्ह्यातील तालुका अचलपूर ,वडगाव फत्तेपूर येथील वारकऱ्यांचे आगमन धाराशिव येथे झाले होते. वारकरी तुळजापूर येथील तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन आळंदी येथून उद्या दिनांक आठ रोजी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी निघाले आहेत. 

महाराष्ट्र राज्यातून व राज्याच्या बाहेरून असे अनेक वारकरी संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम यांच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी निघालेले आहेत. अमरावतीच्या वारकऱ्यांचे स्वागत मंडळाच्या वतीने करण्यात आले. यावेळी या दिंडीचे प्रमुख येवले बंधू महाराज व सामाजिक चळवळीचे धार्मिक व  पौराणिक संप्रदायातील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, सदाशिव खडके यांच्या समवेत स्वागत करण्यात आले.  यावेळी भालचंद्र हुच्चे, नंदकुमार हुच्चे, रणजीत बुरुंग, युवराज हुच्चे,काशिनाथ दिवटे, यांनी दिंडी प्रमुख यांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला. 

 
Top