उमरगा (प्रतिनिधी)- रोटरी क्लब उमरगा व द पुना ब्लाइंड मेन्स असोसिएशन, शंकरशेठ साबळे आय हॉस्पिटल अँड एच. व्ही. देसाई आय इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि. 3) जकेकुरवाडी येथे मोफत मोतीबिंदू व नेत्र आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या शिबिरामध्ये एकूण 120 रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. त्यापैकी 64 रुग्णांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले, तर 49 रुग्णांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली. तसेच डॉ. अमर मंमाळे व डॉ. रोहीत फडताळे यांनी 85 रुग्णांची सर्वसाधारण आरोग्य तपासणी करून आवश्यक मोफत गोळ्या औषध देऊन वैद्यकीय मार्गदर्शन केले. रोटरीचे माजी प्रांतपाल डॉ. दिपक पोफळे यांच्या उपस्थितीत शिबीराचे उद्धाटन करण्यात आले.

यावेळी रोटरी क्लब उमरग्याचे अध्यक्ष अनिल मदनसुरे, सचिव शिवशंकर व्हंडरे, डॉ. अमर मंमाळे, डॉ. रोहीत फडताळे, शंकरशेठ साबळे नेत्र रुग्णालय (सोलापूर) येथील डॉ. महेश पवार, डॉ. तेजस्वी दुरगुळे, प्रियंका कांबळे, सिंधु सुरवसे, जकेकुरवाडीचे सरपंच अमर सूर्यवंशी, तंटामुक्ती अध्यक्ष देवेंद्र सूर्यवंशी, सदस्य मधुकर सूर्यवंशी व ओम मुळे, प्रा. युसुफ मुल्ला, प्रा. राजू जोशी, शिवकुमार दळवी आणि प्रा. गोपाळराव परळकर उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी जकेकुरवाडी ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला. तसेच ग्रामस्थांनी व रुग्णांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आरोग्य उपक्रमाचा लाभ घेतला. 

 
Top