भूम (प्रतिनिधी)- ग्रामीण रुग्णालय, भूम, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व पवनराजे निंबाळकर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत बऱ्हाणपूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
हा उपक्रम धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, माजी मंत्री तथा आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. शिबिरामध्ये विद्यार्थ्यांची सर्वांगीण आरोग्य तपासणी करण्यात आली. सर्दी, खोकला व इतर किरकोळ आजारांवर औषधोपचार करण्यात आले. तसेच गंभीर स्वरूपाचे आजार आढळलेल्या विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल), धाराशिव येथे संदर्भित करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
यावेळी शिवसेना नेते ॲड. विनायक नाईकवाडी, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हाप्रमुख पांडुरंग धस, वैद्यकीय अधिकारी डॉ. ए. ए. शेख, औषध निर्माण अधिकारी एन. एस. कांबळे, मुख्याध्यापक बाबा पठाण, शिक्षिका सुनीता नवले, सी.आर.पी. मनीषा घाडगे तसेच शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
