धाराशिव (प्रतिनिधी)-  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्देशानुसार व जिल्हाध्यक्ष उमेश राजे निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली श्रीराम मंदिरातील देणगी व दानपेटीतील कथित गैरव्यवहाराच्या निषेधार्थ “रघुपती राघव राजाराम“ सत्याग्रह आंदोलन लोकशाही मार्गाने करण्यात आले.

या आंदोलनाची सुरुवात श्रीराम मंदिरात “रघुपती राघव राजाराम“ या भजनाच्या सामूहिक गायनाने करण्यात आली. त्यानंतर धाराशिव शहर पोलीस ठाण्यात जाऊन संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन देण्यात आले. यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी श्रीराम मंदिरातील देणगी व दानपेटीतील कथित आर्थिक गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली. तसेच धार्मिक स्थळांवरील भाविकांच्या श्रद्धेशी कोणत्याही प्रकारची तडजोड सहन केली जाणार नसून, दोषींना शिक्षा मिळेपर्यंत काँग्रेस पक्षाचा लढा सुरू राहील, असा इशाराही देण्यात आला.

या आंदोलनात जिल्हाध्यक्ष उमेश राजे निंबाळकर यांच्यासमवेत राजेंद्र शेरखाने,खलील सर,प्रशांत पाटील,धनंजय राऊत,अझर पठाण अग्निवेश शिंदे,शिला उंबरे,मेहबूब पटेल,शिवाजी गायकवाड,वसंत मडके,जावेद काझी,दयानंद पाटील, अशोक बनसोडे, प्रभाकर लोंढे,जयसिंग पवार,अभिमान पेठे, अभिषेक बागल,सरफराज काझी, संतोष घोरपडे, पोपट शिंदे,मन्सूर शेख,महावीर चव्हाण, संकेत पडवळ,विजय मुद्दे, हरिदास शिंदे, गोरोबा झेंडे, भारतराव काटे,ॲड. ,ॲड. अरविंद बेडगे, कल्याणकर करपे, नानाराव भोसले, बाबा मोमीन तसेच काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.

 
Top