येरमाळा (प्रतिनिधी)- टाकाऊ साहित्याचा उपयोग करून कमी खर्चात बहुउपयोगी पेरणी यंत्र तयार करणारे येरमाळा येथील होतकरू शेतकरी बाबासाहेब कोकाटे यांचा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संजय पाटील दुधागावकर  यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन सत्कार केला.

यावेळी दुधागावकर पाटील यांनी बाबासाहेब कोकाटे यांच्या संशोधक वृत्तीचे कौतुक करत, त्यांनी तयार केलेल्या बहुउपयोगी पेरणी यंत्राची सविस्तर माहिती जाणून घेतली. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या कल्पकतेतून शेतीसाठी उपयुक्त संशोधन घडत असल्याचे सांगून अशा नवकल्पनांना प्रोत्साहन मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी बाबासाहेब कोकाटे यांचा फेटा बांधून, शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला.  या प्रसंगी येरमाळा पत्रकार संघाचे दत्ता गायके, सुधीर लोमटे, बालाजी बारकूल व सोमनाथ बारकूल हे उपस्थित होते.

 
Top