उमरगा (प्रतिनिधी)-  अनुसूचित जाती अंतर्गत आरक्षण उप-वर्गीकरण लागू करण्याच्या समर्थनार्थ (दि.24) रोजी सकल मातंग समाज उमरगा व लोहारा तालुक्याच्या वतीने शहरात व भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात दोन्ही तालुक्यातील समाजबांधव हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. 

या मोचीसाठी माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे, माजी आमदार सुधाकर भालेराव, आझाद क्रांती सेनचे राजेश भाऊ गोंडे, लहुजी शक्ती सेना राज्य उपाध्यक्ष शिवाजी गायकवाड, नागिनाताई कांबळे, लक्ष्मण क्षिरसागर, प्रदेश अध्यक्ष लहुजी शक्ती सेना कैलास खंदारे आदिंसह विवीध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. हा मोर्चा सकाळी ठीक 11 वाजता हुतात्मा स्मारकापासून सुरु आला. हातात विविध फलक आणि पिवळे ध्वज घेऊन आंदोलक मोर्चात सामील झाले होते. मोर्चाचा शेवट  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुण एका जाहीर सभेत झाले. सभेमध्ये अनेक मान्यवरांनी आरक्षण उप-वर्गीकरण लागू करण्याच्या समर्थनार्थ भाषणे केली. तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेल्या निवेदनात  सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने अनुसूचित जाती अंतर्गत 'उप-वर्गीकरण' करण्याचा अधिकार राज्य सरकारांना दिला आहे. अति-वंचितांना मुख्य प्रवाहात आणणे आरक्षण प्रवर्गात समाविष्ट असलेल्या सर्वच जातींचा विकास समान झालेला नाही. उपवर्गीकरणामुळे या प्रवर्गातील सर्वात मागास आणि वंचित राहिलेल्या घटकांना शासकीय सेवा आणि शिक्षणात योग्य वाटा व न्याय मिळेल. महाराष्ट्र शासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाची राज्यात तातडीने अंमलबजावणी करावी. आणि आरक्षणाचे न्याय्य उपवर्गीकरण अतिमागास घटकाना त्यांचा हक्क मिळवुन द्यावा. अशी मागणी करण्यात आली आहे. 

यावेळी दिलीप गायकवाड, शिवाजी गायकवाड, संजय सरवदे बालाजी गायकवाड,  विजय तोरडकर, राजूभाऊ शिंदे, ॲड. सुखदेव होळीकर, दिपक रोडगे विशाल गायकवाड, सुधाकर बनसोडे, राम कांबळे, बबन बनसोडे, संजय कांबळे, मारूती क्षिरसागर, सतिश कांबळे, भाग्यश्री सुरवसे नितीन शिंदे माधव वाघमारे , यांच्यासह सकल मातंग समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top