कळंब (प्रतिनिधी)-  आपले आराध्य दैवत पंढरीचा विठुराया चे दर्शन घेऊन परतत असताना कळंब कथले युवक आघाडी च्या वतीने अन्नछत्र चे आयोजन करण्यात आले गेल्या 9 वर्षापासून हा उपक्रम राबवला जातो. आषाढी एकादशीला पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन घेऊन वारी पावल्याचा भाव मनी ठेवत कृतार्थ झालेले वारकरी दुसऱ्या दिवशी कळंबमार्ग विदर्भ, गोदातीर गाठतात  याच अनुषंगाने कळंब येथे स्व. गणपतरावजी कथले युवक आघाडी कळंब येथे अन्नछत्र चालवते. यात गरमागरम पुरी भाजी, मसाला भात ठेसा, जिलेबी असे स्वादिष्ट भोजन करण्यात आले.

शहरातील नगराध्यक्ष सुनंदा कापसे, शिवाजी कापसे, भिकचंद लोढा, सुरेंद्रलाल बलदोटा, महादेव महाराज अडसूळ, संजय घुले, संदीप बावीकर, अतुल गायकवाड, सतीश टोनगे, तुषार वाघमारे, राजेंद्र बिक्कड, इम्रान मुल्ला, बाबू चाऊस, प्रताप शिंदे, डॉ. गोविंद जोगदंड, हेल्दी ग्रुप, धन निरंकारी सत्संग मंडळ आदी कळंबकर उपस्थित होते. कथले युवक आघाडीचे बाळासाहेब कथले, सुशील बलदोटा,भाऊसाहेब शिंदे, शीतलकुमार घोंगडे, यश सुराणा, ओंकार कुलकर्णी, गजानन फाटक, बाळासाहेब जाधवर, पंकज कोचेटा,गोविंद खंडेलवाल, अशोक फल्ले,वैभव कुपकर, इरफान सय्यद आदी उपस्थित होते.

आघाडीतील महिला लक्ष्मीबाई जाधवर, दिपाली महाजन,सुजाता कथले, प्रतिभा बलदोटा, पूनम शिंदे, अंकिता सुराणा,पूजा खंडेलवाल,प्रति रूणवाल, रूपाली कोचेटा, जान्हवी कथले, मृणाल सावळे, नंदा कीरवे, रूपाली सुप्रिया शिंदे, सिद्धी कोचेटा यांच्यासह शेकडो हाथ राबले. शनिवारी सायंकाळी 6 पासून रविवारी रात्री 11 पर्यंत जवळपास 17 तास अविरत शिवाजी शिरसाठ यांच्या अधिपत्याखाली अन्नछत्रचा भठारखाना सांभाळला.1 हजार पाचशे किलोच्या पुऱ्या, 400 किलो तेल, दोन हजार किलोचा मसाला भात, 700 किलो बटाट्यची भाजी सोबतीला होती.


 
Top