तुळजापूर (प्रतिनिधी)-  महाराष्ट्रातील शेतकरी, गोरगरीब आणि दीनदुबळ्यांचे कल्याण व्हावे आणि राज्यात त्यांचेच राज्य यावे,“ असे साकडे ज्योती ठाकरे यांनी आई तुळजाभवानीच्या चरणी घातले आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ सोबत होते. 

या दौऱ्यादरम्यान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तुळजापूर शहर आणि मतदारसंघाच्या वतीने प्रा. डॉ. प्रदीप ढवळ आणि ज्योतीताई ठाकरे यांचा शाल व श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. या प्रसंगी त्यांच्यासोबत विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. यात प्रामुख्याने जवाहरलालजी पुरोहित, डॉ. हर्षल लिखिते, सुयश प्रधान, भूषण मोरे, प्रवीण हरमळकर, कुणाल टावरे, स्थानिक पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती होती.

या स्वागत सोहळ्याला आणि दर्शन सोहळ्याला शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख श्यामल पवार (वडणे),  शीला उंबरे, सोनाली बालाजी पांचाळ, अर्जुनआप्पा साळुंखे, सुधीर कदम, श्याम पवार, सुनील जाधव यांच्यासह शिवसेना व महिला आघाडीचे अनेक पदाधिकारी, शिवसैनिक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या दौऱ्यामुळे तुळजापूर परिसरातील शिवसैनिकांमध्ये आणि नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला.

 
Top