धाराशिव (प्रतिनिधी)-डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसरात "वन महोत्सव" साजरा करण्यात आला. राष्ट्रीय सेवा योजना विभाग, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसर, धाराशिव, सामाजिक वनीकरण विभाग, धाराशिव आणि रोटरी क्लब ऑफ धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने वन महोत्सव साजरा करण्यात आला. वन महोत्सव अंतर्गत करंज, कांचन, सीताफळ, गजगा, जांभूळ, सिसम, इ. वृक्षांची 200 रोपे लागवड करण्यात आली. विद्यापीठ उपपरिसराचे संचालक प्रा. डाॅ. रमेश चौगुले, रोटरी अध्यक्ष इंद्रजित आखाडे, सचिव निशांत होनमुटे, पदाधिकारी अमर देशमुख, रविंद्र साळुंखे, सुनील गर्जे, प्रदीप खामकर, सुरज कदम, अमोल माने व इतर सदस्य, तसेच राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डाॅ. गोविंद कोकणे, डाॅ. मेघश्याम पाटिल, डाॅ. विक्रम शिंदे, जैवतंत्रज्ञान विभागप्रमुख डाॅ. जितेंद्र कुलकर्णी, जल व भूमी व्यवस्थापन विभागप्रमुख डाॅ. नितीन पाटील, व्यवस्थापन शास्त्र विभागप्रमुख डाॅ. सुयोग अमृतराव, कमवा व शिका योजना समन्वयक डाॅ. सचिन बसैय्ये, गणित विभागप्रमुख डाॅ. राधाकृष्ण तिगोटे, डाॅ. जितेंद्र शिंदे, कक्ष अधिकारी विद्याधर गुरव, यांच्या उपस्थितीत वन महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला.
आपणा सर्वांनाच आज वातावरण बदलाचे परिणाम जाणवत आहेत. तापमान वाढ, पाणी टंचाई, वायु प्रदुषण, जैवविविधतेचा र्हास या सारख्या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी वृक्षारोपण महोत्सव महत्वपूर्ण आहे. कृषी क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी वृक्षारोपण अत्यंत महत्वाचे आहे. या वेळी विद्यापीठ उपपरिसरातील विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
