धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र विधान परिषदेच्या उस्मानाबाद- लातूर-बीड निवडणुकीत बसवराज पाटील विक्रमी 719 मतांनी विजयी झाले आहेत. भाजपचे पाटील यांना 844 मते तर काँग्रेसचे देशमुख यांना 125 मते मिळाली. देशमुखब्यांना 124 मते मिळाले असुन त्यांचे डिपॉझिट जप्त झाले आहे, डिपॉजिट वाचवण्यासाठी 161 मते हवे होती मात्र ती पडली नाहीत. महाविकास आघाडीची मते फुटली हे यातून समोर आले. विजयी उमेदवार बसवराज पाटील यांची विजय रथातून मिरवणूक काढण्यात आली. 

विजयी मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चौकात येताच फटाक्यांची आतिषबाजी करीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. या विजयी रथामध्ये सुनिल चव्हाण, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, मल्हार पाटील, जिल्हा बँकेचे चेअरमन बापूराव पाटील, शरण पाटील, माजी नगराध्यक्ष मधुकर तावडे, अनंत पाटील आदी विजयी रथामध्ये होते. 

भाई उद्धवराव पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), तुळजापूर रोड, धाराशिव येथे मतमोजणी पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणीची प्रक्रिया पारदर्शक आणि सुरळीतपणे पार पडली.


 
Top