सेवेतील शिक्षकांसाठी विशेष शिक्षक पात्रता परीक्षा आयोजित करणे

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे निवेदन

सेवेतील शिक्षकांना तेलंगणा,पंजाब व तामिळनाडू राज्याच्या धर्तीवर विशेष परिक्षेचे आयोजन करणे,गुणांमध्ये सवलत देणे व सेवेतील शिक्षकांसाठी परिक्षेची पुनर्रचना करणे (काठिण्य पातळी कमी करणे) संबधी निवेदन मा.शिक्षण आयुक्त, मा.शिक्षण संचालक यांना दिले.
महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे अध्यक्ष मा.डाँ.नंदकुमार बेडसे साहेब यांची भेट 
डॉ. नंदकुमार बेडसे (भा. प्र. से.), अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांची समक्ष भेट घेवून संघटनेचे निवेदन दिले तसेच विविध राज्याचे संदर्भ पत्र साहेबांना दिले इतर राज्याप्रमाणे टिईटी आयोजन व अभ्यासक्रम ठरविणे , सेवारत शिक्षकांना पात्रता गुणांमध्ये सवलत देणे आदि बाबीवर यावेळी चर्चा झाली.*
*परिक्षा परिषद याबाबत योग्य अहवाल शासनास सादर करेल असे आश्वासन प्रतिनिधी मंडळास बेडसे साहेबांनी दिले.*
*अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य सरचिटणीस कल्याण लवांडे,राज्य उपाध्यक्ष लालासाहेब मगर, जिल्हाध्यक्ष बशीर तांबोळी, जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब वाघमारे, जिल्हासचिव अविनाश मोकाशे, सुरेश भालेराव, दीपक ठोंबरे, बालाजी निंबाळकर, शिवाजी साखरे यावेळी उपस्थित होते.*
*याबाबत मा.शिक्षण मंत्री व मा.शिक्षण सचिव यांची लवकरच अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ भेट घेईl



 
Top