सेवेतील शिक्षकांसाठी विशेष शिक्षक पात्रता परीक्षा आयोजित करणे
अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे निवेदन
सेवेतील शिक्षकांना तेलंगणा, पंजाब व तामिळनाडू राज्याच्या धर्तीवर विशेष परीक्षेचे आयोजन करणे, गुणांमध्ये सवलत देणे व सेवेतील शिक्षकांसाठी परीक्षेची पुनर्रचना करणे (काठिण्य पातळी कमी करणे) संदर्भी निवेदन मा. शिक्षण आयुक्त, मा. शिक्षण संचालक यांना देण्यात आले.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष मा. डॉ. नंदकुमार बेडसे यांची भेट
पुणे : डॉ. नंदकुमार बेडसे (भा. प्र. से.), अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांची समक्ष भेट घेऊन संघटनेचे निवेदन देण्यात आले. तसेच विविध राज्यांचे संदर्भपत्रही त्यांना देण्यात आले. इतर राज्यांप्रमाणे टीईटीचे आयोजन व अभ्यासक्रम निश्चित करणे, सेवारत शिक्षकांना पात्रता गुणांमध्ये सवलत देणे आदी बाबींवर यावेळी चर्चा झाली.
परीक्षा परिषद याबाबत योग्य अहवाल शासनास सादर करेल, असे आश्वासन प्रतिनिधी मंडळास बेडसे यांनी दिले.
अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य सरचिटणीस कल्याण लवांडे, राज्य उपाध्यक्ष लालासाहेब मगर, जिल्हाध्यक्ष बशीर तांबोळी, जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब वाघमारे, जिल्हा सचिव अविनाश मोकाशे, सुरेश भालेराव, दीपक ठोंबरे, बालाजी निंबाळकर व शिवाजी साखरे यावेळी उपस्थित होते.
याबाबत मा. शिक्षण मंत्री व मा. शिक्षण सचिव यांची लवकरच अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ भेट घेणार आहे.
अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ