धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील श्रीपतराव भोसले हायस्कूल मध्ये आंतरराष्ट्रीय 12 वा योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रथम प्रशालेचे मुख्याध्यापक नंदकुमार नन्नवरे यांनी योग का केला पाहिजे त्यामुळे मन शांती आणि वाढत्या मधुमेही, कर्करोग आदिवर उत्तम उपचार म्हणजे भारताने जगाला  दिलेला योग असे मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी प्रशालेचे उपमुख्याध्यापक यशवंत इंगळे, प्रमोद कदम, पर्यवेक्षिका बी.बी. गुंड, पर्यवेक्षक राजेंद्र जाधव, कुमार निकम, बालाजी गोरे, शेषनाथ वाघ, शिक्षक शिक्षिका वृंद विद्यार्थी उपस्थित होते.

 
Top