बऱ्हाणपूर गावाला शिवसेना च्या वतीने मोफत पाणीपुरवठा सुरू
..........................
प्रतिनिधी- भूम-
शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या सूचनेनुसार व मतदारसंघाचे माजी मंत्री तथा आमदार डॉ. तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या शिवसेना गाव भेट दौऱ्या दरम्यान बऱ्हाणपूर गावातील ग्रामस्थांनी तीव्र पाणीटंचाई व पाण्याशी संबंधित विविध अडचणी मांडल्या.
यावेळी पंचायत समिती सभापती पूजा विशाल ढगे, जिल्हा परिषद सदस्य जयश्री काळे (वालवड गट), माजी सभापती निलेश शेळवणे, पंचायत समिती सदस्य श्रीलता लोखंडे तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विशाल ढगे वारेवडगाव उपसरपंच दत्ता नलवडे,यांच्या उपस्थितीत गावकऱ्यांनी आपल्या समस्या मांडल्या.
शिवसेनेच्या “८० टक्के समाजकारण, २० टक्के राजकारण” या तत्त्वानुसार गावचे शिवसेनेचे युवा नेते नितीन पाटील व युवासेना नेते पांडुरंग धस यांनी तात्काळ दखल घेत ग्रामस्थांसाठी मोफत पाणीपुरवठा सुरू केला.
जिल्हा परिषद धाराशिव
मुख्य कार्यकारी अधिकारी
प्रियंवदा म्हाडदळकर, प्रशासक प्रताप गलांडे, ग्रामसेवक किरण आलापुरे, यांचे देखील विशेष सहकार्य लाभले.
शिवसेनेचे युवा नेते नितीन पाटील यांनी स्वतःच्या शेतातील ऊस पिकाची चिंता न करता गावातील नागरिकांच्या पाणीटंचाईचा विचार करून आपल्या विहिरीतील पाणी सार्वजनिक विहिरीत आमदार प्रा डॉ तानाजीराव सावंत यांचा मार्गदर्शनाखाली उपलब्ध करून दिले.
या सामाजिक बांधिलकीच्या कृतीमुळे गावातील ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांच्या या जनहिताच्या कार्याचे समस्त ग्रामस्थ व पंचक्रोशीतील नागरिकांकडून मनापासून कौतुक केले जात आहे.