भूम (प्रतिनिधी)-  माणकेश्वर येथील सटवाई देवीचीच्या मूर्तीचा शेंदूर काढण्यासाठी आलेल्या पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यासोबत मंदिराच्या सभा मंडपामध्ये ट्रस्ट व गावकरी यांच्यासोबत बैठक झाली. 

या बैठकीमध्ये पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी ट्रस्ट व गावकऱ्यासमोर बोलताना सांगितले की, देवीची मूर्ती वर्षानुवर्षे टिकवायची असेल तर मूर्तीवर रासायनिक प्रक्रिया करणे गरजेचे आहे. असे पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी गावातील दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेऊन पत्र व्यवहार करावा असे सांगितले.

त्यामध्ये बैठकीदरम्यान गावकरी व ट्रस्टने पुरातत्त्व विभागात विभागाकडे ट्रस्टचा आक्षेप व म्हणणे पत्रव्यवहार करावा असे या बैठकीमध्ये सर्वांमध्ये ठरले .या बैठकीला तक्रारदार, ट्रस्टचे माजी-आजी अध्यक्ष,गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.


माणकेश्वर येथील सटवाई देवीची पाहणी करण्यासाठी आज आलो होतो. तक्रारदार, ग्रामस्थ व ट्रस्ट यांचे म्हणणे ऐकून घेतले. मूर्तीचे जतन व संवर्धन होणे गरजेचे आहे .त्यामुळे मूर्ती पुढील दीडशे ते दोनशे वर्षे टिकू शकते. आज मूर्तीवर आभूषण असल्यामुळे पूर्ण बघितली नाही .परंतु मूर्ती पूर्ण बघितल्यानंतर त्याचा अहवाल राज्य शासन पुरातत्व विभाग यांच्याकडे सादर करणार आहोत.

सागर मुंडे

पुरातत्त्व विभाग


 माणकेश्वर येथील सटवाई देवीच्या शेंदूर काढण्यासाठी आमचा विरोध आहे. शेदुर काढल्यामुळे भाविक भक्तांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात .सदरील देवस्थान यादवकालीन असून हे देवस्थान पुरातन विभागाच्या आखतऱ्यामध्ये येत नाही. राज्य संरक्षित स्मारक म्हणून सटवाई मंदिर घोषित केलेले नाही. वेळ पडल्यास आम्ही न्यायालयीन दाद मागणार आहोत.

बाबासाहेब अंधारे

अध्यक्ष सटवाई देवस्थान

 
Top