भूम (प्रतिनिधी)-  भूम शहरातील कसबा विभागामध्ये सामाजिक समता, शिक्षण आणि परिवर्तनाचा संदेश देणारे महान समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी परिसरात प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले होते.

कार्यक्रमाची सुरुवात माजी नगराध्यक्ष संजय गाढवे यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली. यानंतर उपस्थित मान्यवरांनी फुले यांच्या कार्याचा आणि विचारांचा गौरव करत, त्यांच्या शिक्षणविषयक आणि सामाजिक क्रांतीच्या कार्याची आठवण करून दिली. समाजातील वंचित घटकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे आजही ते प्रेरणास्थान असल्याचे वक्त्यांनी नमूद केले.

यावेळी नगरसेवक अभिजीत शेटे, सुनील माळी, अमोल माळी, आदेश माळी, अमोल भोसले, प्रदीप चौधरी, निलेश माळी, अक्षय माळी, अनिल माळी, सुहास माळी, शशी माळी, रवी माळी, बापू माळी, बाळासाहेब माळी, आबा हवालदार, सतीश माळी, धनंजय माळी, पत्रकार धनंजय शेटे, सुजित वेदपाठक, बालाजी साबळे, तात्या माळी यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रसार करण्याचा संकल्प करण्यात आला. तसेच समाजात समता, बंधुता आणि शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी सर्वांनी एकजूट होण्याचे आवाहन करण्यात आले.

 
Top