भुम (प्रतिनिधी)- ईट येथे साहेब महोत्सव निमित्त राज्यस्तरीय समय गट व वैयक्तिक गट बाल व प्रौढ नृत्य स्पर्धेचे आयोजन राज्याचे आरोग्य मंत्री माजी मंत्री आमदार डॉ. तानाजीराव सावंत यांच्या वाढदिवसाच्या निमित्त कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रवीण देशमुख यांच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमांमध्ये पहिल्या दिवशी दिनांक 11 एप्रिल रोजी बाल गटातील स्पर्धा सामूहिक गट व वैयक्तीक गट असं उत्साहाच्या वातावरणामध्ये पार पडल्या. राज्यातील अनेक भागातून समूह गट व वैयक्तिक नृत्य स्पर्धेसाठी सहभाग नोंदवला होता. या प्रसंगी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक केशव सावंत, अण्णासाहेब देशमुख, सुनील भोईटे, नागनाथ नाईकवाडी, महिला आघाडी जिल्हाप्रमुख अर्चना दराडे, बाळासाहेब मांगले, सत्यवान गपाट, बालाजी गुंजाळ , विशाल ढगे, प्रवीण गायकवाड, भाऊसाहेब मारकड, राहुल डोके, बालाजी काळे,जेष्ठ नेते केशव चव्हाण, आदी उपस्थित होते.
या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक नृत्य निकेतन अकॅडमी ग्रुप, द्वितीय क्रमांक साया अकॅडमी ग्रुप, तृतीय क्रमांक ऑसम ग्रुप, चतुर्थ क्रमांक नवाकुर ग्रुप यांनी क्रमांक पटकावले. तर वैयक्तिक गटामध्ये प्रथम क्रमांक विराट काळे, द्वितीय क्रमांक अदिती जाधव, तृतीय क्रमांक शौर्य गोडबोले, चतुर्थ क्रमांक अदिव्यता कांबळे, यांनी क्रमांक पटकावले सुत्रसंचालन डॉ. हनुमंत गवळी यांनी केले.या नृत्याचे परीक्षण रोहित राठोड व सिद्धी गाडेकर यांनी केले. उपस्थित कलाकारांना सन्मानचिन्ह व बक्षीस वितरण करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ईश्वर देशमुख बंटी देशमुख अक्षय शिंदे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रम यशस्वी करण्यात आला.

