तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील होंनाळा येथील शेतकरी विजय गिरजाप्पा शेलार यांच्या गोठ्यात सोमवारी दि. 30 मार्च रोजी  पशुखाद्य खाल्ल्यानंतर 3 गाईंचा जागीच मृत्यू झाला. तर 2 गाई अत्यावस्थेत आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, शेलार यांच्याकडे एकूण 18 जनावरे आहेत. सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे गायींची धार काढल्यानंतर त्यांनी पशुखाद्य तयार करून जनावरांना देण्यास सुरुवात केली. पहिल्या पाच गाईंना खाद्य दिल्यानंतर काही क्षणांतच त्यापैकी तीन गाई अचानक कोसळून मृत्युमुखी पडल्या, तर दोन गाईंची प्रकृती गंभीर झाली. घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून या गाईचा हत्यारा कोण आहे याचा शोध घेण्याची मागणी होत आहे.


 
Top