भूम (प्रतिनिधी)- तालुक्यातील बऱ्हाणपूर येथील गट नंबर 114 गायरान जमीन मागासवर्गीय लोक कसून उपजीविका भागवत असलेल्या जमीनीवर सुरु असलेले सौरउर्जा प्रकल्पाचे बेकायदेशीर काम सुरु करण्यात आले असुन सदरील अनाधिकृत पणे सुरू करण्यात आलेले सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम तात्काळ थांबवण्यात यावे यासाठी तहसील कार्यालयासमोर दि. 30 रोजी पासुन धरणे आंदोलन सुरू करण्यात येणार आहे
प्रशासनास दिलेल्या निवेदनास असे म्हटले आहे की मौजे बन्हाणपुर, ता. भुम, जि. धाराशिव येथील सर्व्हे नं. 114 मधील क्षेत्र 13 हे. 89 आर इतकी जमीन ही गायरान (सार्वजनिक) जमीन आहे. सदर जमीन ही गावातील सर्व मागासवर्गीय अनुसूचित जाती मधील नागरीकांची सामोहिक मालमत्ता असुन अनेक वर्षापासुन गावातील शेतकरी पशुपालक तसेच मागासवर्गीय समाजातील कुटुंबिय आपला उदरनिर्वाह करण्यासाठी शेती व जनावरांच्या चाऱ्यासाठी वापर करीत आहे. मात्र सदर गायरान जमीनीवर सध्या सौरउर्जा प्रकल्पाचे काम सुरु करण्यात आले आहे. हे काम करतांना गावातील नागरीकांची कोणतीही बैठक घेण्यात आलेली नाही. तसेच ग्रामसभेची अधिकृत परवानगी घेतलेली नाही. त्यामुळे गावातील गरीब कुटुंबाच्या उपजिविकेवर मोठा परिणाम होत आहे. महाराष्ट्र जमीन महसुल संहिता 1966 चे कलम 38,53,63 नुसार गायरान जमीन ही सार्वजनिक उपयोगासाठी राखीव असते, अशा जमीनीचा वापर बदलण्यासाठी शासनाच्या अनेक विभागाच्या परवानग्या घ्याव्या लागतात व ग्रामसभेचा ठराव आवश्यक असतो. तसेच महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम 1958 नुसार गावातील सार्वजनिक मालमत्तेबाबत ग्रामसभेचा निर्णय बंधनकारक असतो.
परंतू ग्रामसभा न घेता व ग्रामसभेबाबत कोणत्याही प्रकारची माहिती न देता ग्रामसभा घेतल्याचे दर्शवून खोटया स्वाक्षऱ्या करून खोटे नाहरकत प्रमाणपत्र तयार केले आहे .त्याच प्रमाणे भारत सरकारच्या विविध शासन निर्णयानुसार गायरान जमीनीचा वापर करतांना गावातील पारंपारिक वापर, जनावरांची चाराई व गरीब कुटुंबाचा उदरनिर्वाह याचा विचार बंधनकारक आहे. आमच्या गावामध्ये जनावरे चारण्यासाठी अशा प्रकारची कुठलीही जमीन नाही. सदर सौरउर्जा प्रकल्पाचे काम सखोल चौकशी होईपर्यंत तात्काळ बंद करण्यात यावे.
या संपुर्ण प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करुन जबाबदार अधिकारी व संबंधीत व्यक्तींवर कठोर कार्यवाही करण्यात यावी. गायरान जमीनीवरील मागासवर्गीय कुटुंबाचे पारंपारिक हक्क कायम ठेवण्यात यावे. एम.एस.ई. बी. या विभागाने खाजगी कंपनीला भाडेतत्वावर दिलेली गायरान जमीनीची चौकशी करण्यात यावी. यासाठी आधार बहुउद्देशीय संघटना व बऱ्हाणपूर ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे प्रशासनास दिलेल्या निवेदनावर आधार बहुउद्देशीय सामाजिक संघटना संस्थापक अभिमान मिसाळ,मा. सरपंच शंकर मिसाळ, माजी ग्रा.प सदस्य नाथा मिसाळ, विलास मिसाळ सुर्यकांत मिसाळ, अशोक वारे, अकूंश मिसाळ, दिपक मिसाळ, सतिश मिसाळ, खंडू मिसाळ, अतुल मिसाळ, यांच्या सह नागरिकांनी मागणी केली आहे.