धाराशिव (प्रतिनिधी)- मध्यपूर्व व परिसरातील काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार व महाराष्ट्र शासन यांनी जारी केलेल्या सूचनांनुसार संबंधित देशांतील भारतीय दूतावासांनी तेथे वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांसाठी सुरक्षा ॲडव्हायझरी जारी केली आहे.
या अनुषंगाने पॅलेस्टाईन (रामल्ला), कतार (दोहा), सौदी अरेबिया (रियाध), इस्रायल (तेल अवीव), इराण (तेहरान), इराक (बगदाद), कुवैत, बाहरीन, मस्कत, जॉर्डन आणि संयुक्त अरब अमिरात (अबू धाबी) येथे वास्तव्यास असलेल्या सर्व भारतीय नागरिकांनी सतर्क राहावे. अनावश्यक हालचाल टाळावी आणि स्थानिक प्रशासन तसेच भारतीय दूतावासांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे. आपत्कालीन परिस्थितीत संबंधित देशांतील भारतीय दूतावासांच्या 24X7 हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क साधावा.
जिल्ह्यातील ज्या नागरिकांचे नातेवाईक किंवा जवळच्या व्यक्ती र्तीावग्रस्त देशांमध्ये अडकून पडल्या असतील, त्यांनी तत्काळ जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधवा. संबंधित व्यक्तींना कोणत्या मदतीची आवश्यकता आहे किंवा ज्यांच्याशी संपर्क होवू शकत नाही, त्यांची सविस्तर माहिती प्रशासनाला कळवावे. परदेशात असलेल्या नागरिकांनी आपले लोकेशन कुटुंबियांना सतत कळवावे, मोबाईल चार्ज ठेवावा आणि अफवा पसरवू नये, अशा सुचनाही प्रशासनाने दिल्या आहेत.