मुरुम (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र आयोजित करिअर कट्टा अंतर्गत 2025-26 चा राज्यस्तरीय उत्कृष्ठ प्राचार्य प्रवर्तक पुरस्कार छत्रपती संभाजीनगर विभागातून श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय अस्वले यांना अध्यक्ष यशवंत शितोळे, अजय धोंडे , सिनेट सदस्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,  प्राचार्य  डॉ  हरिदास विधाते, डॉ. वसंत सानप, माजी सिनेट सदस्य आणि बलभीम महाविद्यालयाचे माजी प्राचार्य यांच्या हस्ते देण्यात आला.

आनंदराव धोंडे महाविद्यालय कडा येथे  दि. 02 मार्च रोजी आयोजित करिअर कट्टा कार्यशाळेत हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी महाविद्यालय करिअर कट्टा विद्यार्थी संसदेस उत्कृष्ट विद्यार्थी संसद आणि इतर पाच पुरस्कार मिळाले. समन्वयक डॉ  एस पी पसरकल्ले, डॉ सी.डी करे, डॉ ए के कटके, विद्यार्थी संसद मुख्यमंत्री अनिशा सुरवसे, गणेश मोरे, आसिफ शेख, सैफ इनामदार, दिशा सुरवसे, योगेश्वरी मारकर आदींनी पुरस्कार स्विकारले. यावेळी जिल्हा प्राचार्य प्रवर्तक मोहम्मद इलियास सर. प्राचार्य शिरीष पवार प्राचार्य मुळे सर प्राचार्य निंभोरे सर प्राचार्य डोंगरे सर.  प्राचार्य जगदाळे मॅडम भगवान परकाळ , जिल्हा समन्वयक  दत्तात्रय नरसाळे विभागीय सह समन्वयक लक्ष्मीनारायण कुरूपटवार यांची उपस्थिती होती 

त्याच्या यशाबद्दल भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल मोरे, उपाध्यक्ष अश्लेष मोरे, सरचिटणीस जनार्दन साठे, सचिव पद्माकर हराळकर, सहसचिव डॉ सुभाष वाघमोडे,  उपप्राचार्य डॉ पी ए पिटले उप प्राचार्य डॉ व्ही एस इंगळे उपप्राचार्य प्रा जी एस मोरे पर्यवेक्षक  प्रा एस ए महामुनी , श्री राजकुमार सोनवणे श्री नितीन कोराळे आणि प्राध्यापक यांनी अभिनंदन केले आहे.


 
Top