परंडा (प्रतिनिधी)- तुला इथे शेती करू देणार नाही अशी धमकी देत तालुक्यातील बावची येथील एका दलित शेतकऱ्याच्या शेतातील बोअर व पाईपलाइनची तोडफोड केल्याने सुमारे 45 हजारांचे शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. 

जातीय द्वेषातून एका दलित शेतकऱ्याला लक्ष्य करून त्याच्या शेतातील पाइपलाइन, बोअरवेल आणि सिंचन साहित्याची तोडफोड केल्याची धक्कादायी  घटणा परंडा तालूक्यातील बावची येथे घडली आहे. इतकेच नव्हे, तर तुला इथे शेती करू देणार नाही.असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ आणि धमक्या दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी बावची येथील रामचंद्र विक्रम थिटे यांच्याविरोधात परंडा पोलिस ठाण्यात गुरुवारी दि.26 मार्च रोजी दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार ऑट्रॉसिटीखाली  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 
Top