मुरूम (प्रतिनिधी)- येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात शुक्रवारी (ता. 6) रोजी विशेष सत्कार करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय सेवा योजना व व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालय, धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा नेतृत्व विकास उद्बोधन शिबिर 2026 मौजे गडदेवदरी, जि. धाराशिव या ठिकाणी दि. 1 ते 5 मार्च दरम्यान पार पडले. या शिबिरात माधवराव पाटील महाविद्यालयातील कु. सरस्वती पाटील, अभिषेक पुजारी, गणेश बिराजदार यांनी सहभाग नोंदवला. या शिबिरात सरस्वती पाटील यांनी अहवाल लेखन, चित्रकला स्पर्धा, पुस्तक परीक्षण, वक्तृत्व स्पर्धा, नाट्य सादरीकरण आदी स्पर्धेत उत्कृष्ट सहभाग नोंदवून जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक, अभिषेक पुजारी यांनी उत्कृष्ट अहवाल लेखन (प्रथम) संसद अभिप्राय (द्वितीय) तर गणेश बिराजदार वक्तृत्व स्पर्धा (द्वितीय), अहवाल लेखन (प्रथम) क्रमांक पटकाविला. उत्कृष्ट कार्यक्रमाधिकारी म्हणून प्रा. डॉ. शीला स्वामी यांना गौरविण्यात आले. या शिबिरात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन विविध स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांचा  महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार यांच्या हस्ते शाल, प्रमाणपत्र व पुष्पहार घालून विशेष सत्कार शुक्रवारी (ता. 6) रोजी करण्यात आला. यावेळी प्रा. डॉ. सतीश शेळके, डॉ. शिवपुत्र कनाडे, डॉ. राम बजगिरे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. प्रतापसिंग राजपूत, प्रा. अशोक बावगे, प्रा. गोपाळ कुलकर्णी, डॉ. विलास खडके आदींची उपस्थिती होती.   


 
Top