भूम (प्रतिनिधी)- येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व मुलींना जिल्हा परिषद धाराशिव मार्फत राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा योजनेअंतर्गत  80 तासांचे कराटे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याची सुरुवात आजपासून करण्यात आली. 7 ब्लॅक बेल्ट करणसिंग कालिदास कंचे हे प्रशिक्षण देणार आहेत. यावेळी त्यांचा सत्कार शाळेच्या वतीने करण्यात आला. यावेळी सर्व शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top