भूम (प्रतिनिधी)- राम जन्मला ग सखे राम जन्मला, या जयघोषात कसबा येथील पुरातन श्रीराम मंदीरात दुपारी बारा वाजता पुष्पवृष्टी करत राम जन्म सोहळा उत्साहात पार पडला..

सकाळी श्रीराम लक्षण सीता यांच्या मुर्तीस महाअभिषेक संपन्न झाला यानंतर ह भ प अनुप महाराज जोशी यांचे श्रवणीय नारदिय किर्तन सकाळी 10 ते 12 या वेळेत पार पडले यांना पेटी साथ अंबादास देशपांडे व तबलासाथ अरुण देशमुख यांनी  दुपारी 12 वाजता पुष्पवृष्टी करत जन्म सोहळा पार पडला यानंतर श्रीरामाला नाहु घालुन पाळण्यात ठेवुन महिलांनी पाळणा गायीला यानंतर महाआरती करत जोरदार अतिषबाजी करण्यात आली यानंतर प्रसाद वाटप करण्यात आला.

सकाळ पासुनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी दिसुन आली या सोहळ्यास श्रीराम मंदीर उत्सव समिती यांनी विषेश परिश्रम घेतले संध्याकाळी आठ वाजता कसबा विभागातुन श्रीरामाचा पालखी सोहळा संपन्न झाला या सोहळ्यास मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाल्याचे दिसुन आले. 


श्रीरामाच्या गाभा-यास आकर्षक सजावट 

श्रीराम जन्मा निमित्ताने श्रीरामाच्या मुर्तीस आर्कषक फुलांची सजावट करण्यात आली होती शेवती व गुलाबाच्या फुलांनी श्रीराम लक्ष्मण व सीता यांच्या मुर्ती भाविकांचे लक्ष वेधुन घेत होत्या. 

 
Top