धाराशिव (प्रतिनिधी)-  जागतिक महिला दिनानिमित्त तालुक्यातील कामेगाव येथे महिलांसाठी मोफत सर्वरोग निदान तपासणी व उपचार आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. रुपामाता फाऊंडेशन व शेतकरी सेना यांच्या संयुक्त विद्यमाने प्राथमिक आरोग्य केंद्र, कामेगाव येथे आयोजित या शिबिराला परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाचे उद्घाटन धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी व्हाईस चेअरमन व विद्यमान संचालक संजय देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी रुपामाता उद्योग समूहाचे कार्यकारी संचालक तसेच विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष ॲड. अजित गुंड, ॲड. अंजली व्यंकट गुंड, पालकमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी दीपक येवते,  शेतकरी सेना  धाराशिव तालुका अध्यक्ष हनुमंत कदम, अनंत भक्ते, ज्ञानेश्वर कदम, नितीन शेवाळे, प्रमोद कदम, विशाल झोरे, शिवाजी कापसे, मनोज मोरे तसेच रुपामाता फाऊंडेशनचे समन्वयक गजानन पाटील, राहुल यादव आदी उपस्थित होते.

तसेच धाराशिव जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. युक्ता खन्ना, नेत्र विभागाचे डॉ. सागर जगताप, मेडिसिन विभागाचे डॉ. किरण पाटील, विश्वजीत जगदाळे, समाजसेवा अधीक्षक अक्षय व्हाटकर, एनसीडी स्टाफ, आरोग्य मित्र अजय कदम, मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे जिल्हा समन्वयक महारुद्र नक्षे, नर्स व आरोग्य कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आरोग्य शिबिरामुळे परिसरातील महिलांना मोठा दिलासा मिळाला असून ग्रामीण भागात अशा उपक्रमांची गरज असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

 
Top