धाराशिव (प्रतिनिधी)- गावागावात महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या अर्चनाताई पाटील यांची धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदी निवड झाल्याने सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या निवडीमुळे जिल्ह्यातील महिला सक्षमीकरणाला नवे बळ मिळणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर शशिकल पाटील, अनिता तोडकर व किरण निंबाळकर यांनी अर्चनाताई पाटील यांचे अभिनंदन करत त्यांच्या नेतृत्वामुळे महिला बचत गटांच्या माध्यमातून अनेक महिलांना स्वावलंबी होण्याची प्रेरणा मिळाल्याचे सांगितले. तसेच ग्रामीण भागातील महिलांना सक्षम करण्यासाठी त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय असल्याचे त्यांनी नमूद केले. अर्चनाताई पाटील यांच्या पुढील कार्यकाळात महिला सक्षमीकरण, ग्रामीण विकास व विविध सामाजिक उपक्रमांना अधिक गती मिळेल. असा विश्वास व्यक्त करण्यात आला. त्यांच्या नेतृत्वातून जिल्ह्यातील महिलांसाठी नव्या संधी उपलब्ध होतील, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

 
Top