धाराशिव (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांनो आता आनंदाने भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा असे प्रतिपादन श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांनी केले. 

येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात जिमखाना आणि सांस्कृतिक विभागाच्या वतीने वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे कौस्तुभ गावडे बोलत होते.

पुढे ते म्हणाले की, व्यक्तीगत स्वार्थ साधण्यासाठी शिक्षणाचा उपयोग होतोच, पण त्याचबरोबर आपण आपल्या समाजाचे कांहीतरी देणे लागतो ही बाब आपण विसरु नये.  महाविद्यालयाचे प्र प्राचार्य डॉ संदीप देशमुख यांनी प्रास्ताविकात शैक्षणिक कार्याचा आढावा घेतला.  यावेळी महाविद्यालय विकास समिती सदस्य नानासाहेब पाटील, बाळासाहेब शिंदे, मराठवाडा सह विभाग प्रमुख माजी प्राचार्य डॉ जयसिंगराव देशमुख, कनिष्ठ विभाग प्रमुख प्रा बबन सुर्यवंशी ,प्रा राजा जगताप यांच्यासह माजी  विद्यार्थी सत्कारमूर्ती  डॉ चंद्रजित जाधव, प्रा प्रविण बागल, तृष्णाली साळुंके, सबा शेख व इतर सर्व माजी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अरविंद हंगरगेकर यांनी केले. तर आभार प्रा. विवेकानंद चव्हाण यांनी मानले.


 
Top