भूम (प्रतिनिधी)-  दिनांक 2 मार्च रोजी नगर परिषद सभागृह मध्ये सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली असता या सभेच्या सुरुवातीला नगराध्यक्ष या नात्याने अभय योजने च्या माध्यमातून नळ पट्टी, घरपट्टी कर याच्यावर लावण्यात आलेले कर माफी चा लाभ तुरळक लोकांनीच घेतला असल्याने उर्वरित बहुतांश लोक या लाभापासून वंचीत राहिले आहेत. अश्या नागरिकांना पुन्हा या योजनेचा लाभ मिळावा या हेतूने तसा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यासाठी सर्वानुमते सभागृहात सादर केलेले प्रस्ताव मंजूर करण्यात आले. परंतु हा प्रस्ताव पाठण्याच्या सूचना देण्यात आले असून याला महाराष्ट्र भागातील नगरपालिकेचा समावेश होतो. या मूळे प्रस्ताव मंजुरी मिळे पर्यंत नागरिकांनी घाई न करता कोणाच्या सोशल मीडियाच्या अथवा आयक्यू बातम्या वर विश्वास न ठेवता नगर परिषद मध्ये चौकशी करून आपला संभ्रम दूर करावा.

भूम शहरातील नागरिकांना अभय योजनेचा लाभ मिळावा यासाठीच सर्व नगरसेवकांच्या सर्वानुमते मंजूर झालेले ठरावाला शासन स्तरावर मंजुरीसाठी पाठवण्याच्या सूचना केल्या असल्या तरी मी माजी मंत्री तथा आमदार तानाजीराव सावंत, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनिताताई पवार आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून हे प्रस्ताव मंजूर करून घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न मी करणार असे पत्रकारांशी संवाद सांगताना गाढवे बोलत होत्या.

 
Top