भूम (प्रतिनिधी)-  प्रत्येक क्षेत्रात त्याग केल्या शिवाय फळ मिळत नाही, जनसंघाच्या माध्यमातून अनेकांनी त्याग केला. त्यांच्या विचारधारेवर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केंद्र, राज्यात आणि जिल्ह्यात सरकार आहे. प्रगत राष्ट्रासाठी ही बाब समाधानकारक असल्याचे मत जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण अभियानाच्या समारोप प्रसंगी व्यक्त केले. 

शनिवार दि. 28 व रविवार दि 29 मार्च या दोन दिवसाच्या कालावधीचे भारतीय जनता पार्टीच्यावतीने भूम शहर व ग्रामीण मंडल स्तरीय प्रशिक्षण वर्ग श्री संत गजानन महाराज मंदिर सभागृहात माजीमंत्री आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, राज्य परिषद सदस्य तथा मतदार यादी पुनरनिरीक्षण विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर, जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले.  सात सत्रामध्ये विविध विषयावर वक्त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. नितीन काळे, सचिन घोडके, रामदास कोळगे, देविदास पाठक, अस्मिता कांबळे, शिवाजी गिट्टे, बाळासाहेब क्षिरसागर सखोल मार्गदर्शन केले. 

दोन दिवसाच्या प्रशिक्षण वर्गात तालुक्यातून 163 बूथ प्रतिनिधी निवासी उपस्थित होते. सर्व प्रशिक्षणार्थींची भोजन निवास व्यवस्था देखील चांगल्या पद्धतीची केली होती. यात महिलांची सुद्धा उपस्थिती चांगली होती. संपूर्ण प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणाचे प्रभारी दत्ताभाऊ राजमाने, तालुकाध्यक्ष संतोष सुपेकर, शहर अध्यक्ष बाबासाहेब वीर,  महिला तालुकाध्यक्ष स्वाती तनपुरे, शहराध्यक्षा विद्या खामकर, मन की बात व्यवस्थापन करणारे सिद्धार्थ जाधव, शुभम खामकर तसेच नगरसेवक तथा प्रभारी आबासाहेब मस्कर, शांतीराज बोराडे, बापू बगाडे, संदीप खामकर, शरद चोरमले, रघूनाथ वाघमोडेसह अनेकांनी परिश्रम घेतले. प्रत्येक सत्रामध्ये गीत गायन महादेव वडेकर यांनी केले. तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शंकर खामकर यांनी केले.


 
Top