भूम (प्रतिनिधी)- राष्ट्र सेवा दलाच्या क्रियाशील कार्यकर्त्यांचा राज्यव्यापी मेळावा 4 व 5 एप्रिल रोजी पुण्यात घेण्यात येणार आहे.
साने गुरुजी स्मारक येथे होणाऱ्या मेळाव्यास महाराष्ट्रातून दोनशे कार्यकर्ते सहभागी होणार असून सध्या होणाऱ्या राष्ट्रीय-अंतरराष्ट्रीय घडामोडीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सर्व स्थरावर होत असलेली पीछेहाट, राष्ट्र सेवा दलाची राष्ट्रीय पातळीवर असलेली गरज व कायदेशीर बाबीवर चर्चा करून पुढील दोन वर्षाचे नियोजन करण्यात येणार आहे.
राष्ट्र सेवा दल, मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या बैठकीत झेलम परांजपे,श्याम निलंगेकर,प्रकाश कांबळे, सुहास कोते,वसंत एकबोटे,प्रवीण वाणी,दीपाली आपटे,संजय गायकवाड,प्रशांत दांडेकर, मनीषा पाटील,अश्विनी सातव,दत्ता पाकीरे,भीमराव अडसूळ,बाळासाहेब गायकवाड,संदीप दिवेकर,प्रकाश कदम, विलास किरोते आदी मान्यवर उपस्थित होते. क्रियाशील कार्यकर्त्याचा राज्यव्यापी मेळावा यशस्वी करण्यासाठी वेगवेगळ्या समित्या गठीत करण्यात आल्या असल्याचे श्याम निलंगेकर यांनी प्रसिद्धी पत्रद्वारे कळवले आहे.