स्वयंअध्ययन व आपल्या अभिरुचीनुसार घेतलेल्या शिक्षणामुळे जीवनात उत्तुंग यश प्राप्त होते -प्राथमिक शिक्षणाधिकारी रविंद्र खंदारे यांनी मांडले विचार

धाराशिव (प्रतिनिधी)- श्रीपतराव भोसले हायस्कूलने यावर्षीही एन .एम.एम. एस अर्थात्‌‍ राष्ट्रीय आर्थिकदृष्टया  दुर्बल घटक शिष्यवर्ती परीक्षेत दैदिप्यमान यश प्राप्त केले असून तब्बल 156 विदयार्थी शिष्यवर्तीधारक झाले आहेत. या सर्वांचा सत्कार प्रशालेच्यावतीने मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.

निमित्त होते नुकत्याच घोषीत झालेल्या एनएमएमएस परीक्षाच्या अंतरिम निकालावरून या समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.प्रथम मान्यवरांच्या हस्ते गुरुवर्य के .टी. पाटील सरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर प्रशालेच्या वतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभाग प्रमुख कुमार निकम यांनी केले , यात वर्षभरात  चालणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती त्यांनी सर्वांसमोर मांडली.

या कार्यक्रमाचे  प्रमुख पाहुणे शिक्षणाधिकारी रविंद्र खंदारे यांनी मुलांनी स्वयंशिस्त सह स्वयंमअध्ययना बरोबर आपल्या अभिरूची नुसार शिक्षणातून जीवनात यश संपादन करावे. असे मत व्यक्त केले. तर जेष्ठ शिक्षणतज्ञ एम.डी. देशमुख यांनी  सातत्यपूर्ण अभ्यासावर भर दयावा असे सांगितले.

तर कार्यक्रमाचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांचे, अध्यापकांचे, विभाग  प्रमुखांचे अभिनंदन करून असेच यश दरवर्षी संपादन करावे, असा मौलिक  सल्लाही त्यांनी दिला.

आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचे अध्यक्ष या कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषविले. तर प्रमुख पाहुणे धाराशिव जिल्हयाचे प्राथमिकचे शिक्षणाधिकारी रविंद्र खंदारे, ज्येष्ठ शिक्षण तज्ञ एम.डी. देशमुख, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य पाटील, प्राचार्य नंदकुमार नन्नवरे, उपप्राचार्य संतोष घार्गे , उपमुख्याध्यापक प्रमोद कदम, पर्यवेक्षक तथा सांस्कृतिक विभाग प्रमुख सुनील कोरडे, बी.बी. गुंड, प्रा. विनोद आंबेवाडीकर उपस्थित होते.

156 पात्र विद्यार्थ्यापैकी 39 विद्यार्थी 100 गुणांपेक्षा अधिक गुण घेणारे तर सारथी पात्र 17 विदयार्थी ठरले असून या सर्वांचा व त्यांना अध्यापन करणाऱ्या दयानंद शिराळ, ए.ए. जाधव, ए.सी. माढे, एम.एच. वाकुरे, एम.एम. धावणे या अध्यापकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या सत्कार प्रसंगी पालक, विद्यार्थी , शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूर्यकांत पाटील यांनी केले. तर शेवटी सर्वांचे आभार उपमुख्याध्यापक प्रमोद कदम यांनी मानले.

 
Top