वाशी (प्रतिनिधी)- वाशी तालुक्यातील पारगाव मंडळातील पारगाव, जानकापूर, हातोला, जेबा, पांगरी, ब्रह्मगाव, पिंपळगाव(क), लोणखस, दहिफळ, शेलगाव, लाखनगाव, विजोरा, घाटपिंपरी, जवळका, शेंडी या गावच्या सर्व नागरिकांना वाशी तहसीलदार यांचे वतीने आवाहन करण्यात येते की, महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आयोजित केले आहे .महाराष्ट्र शासनाने याबाबत अभियानातील शासकीय सेवा व लाभ थेट जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या सूचना दिल्या आहेत .त्या अनुषंगाने पारगाव येथे शनिवार दिनांक सात मार्च 2026 रोजी भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर शिबिरात प्रलंबित फेरफार निकाली काढणे ,सातबारा वरील किरकोळ दुरुस्ती,सर्व प्रमाणपत्र वाटप,अकृषिक तरतुदी संबंधित मार्गदर्शन,सामाजिक सहाय्य योजनेचे अर्ज स्वीकारणे व लाभ मंजूर करणे, ॲग्री स्टॅक नोंदणी ,प्रलंबित इकेवायसी पूर्ण करणे, पुरवठा विषयक सेवा शिधापत्रिकेतील नाव कमी करणे, नाव वाढवणे ,दुय्यम शिधापत्रिका नवीन शिधापत्रिका इत्यादी महसुली व पुरवठा विषयी मार्गदर्शन, जिवंत सातबारा मोहीम, मुख्यमंत्री बळीराजा शेती पानंद रस्त्याविषयी मार्गदर्शन याबाबत पारगाव मंडळातील सर्व गावातील नागरिकांनी सदरील शिबिरात सहभागी व्हावे व योजनांचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी मंडळ अधिकारी पारगाव किंवा संबंधित ग्राम महसूल अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन वाशी तहसीलदार प्रकाश म्हेत्रे यांनी केले आहे.