भूम (प्रतिनिधी)- भूम नगर परिषद नगराध्यक्ष दालनात भूम नगरपरिषदेचे चालू वर्षाचे 2026 27 चे अर्थसंकल्प सादर प्रकरणी पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने अर्थसंकल्प सादर करण्याच्या दिवशी सात नगरसेवक आणि 14 नगरसेवक विरुद्ध असा अर्थसंकल्प नामंजूर करण्यात आला. यासंदर्भात नगराध्यक्ष संयोगिता गाढवे यांनी सविस्तर माहिती अशी दिली की अर्थसंकल्प सादर करण्याच्या दिवशी सात नगरसेवकांनी अर्थसंकल्पाला मंजुरी दिली. परंतु 14 नगरसेवकांनी याला मंजुरी न दिल्याने अर्थसंकल्पामध्ये काही दुरुस्त्या करून भूम शहराच्या नागरिकांच्या सुख सुविधेसाठी अर्थसंकल्प मंजूर होणे गरजेचे असल्याने तसा अर्थसंकल्प धाराशिचे जिल्हा अधिकारी यांच्या दालनात मंजुरीसाठी दाखल करण्यात आला आहे.

पुढे गाढवे यांनी सांगितले की,अर्थसंकल्प सादर करताना मागील 24 25 वर्षाचा अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने पुढील चालू वर्षाचे अर्थसंकल्प सादर केले जात असते. मात्र विरोधक नगरसेवक यांनी चालू अर्थसंकल्पाचा विचार न करता मागील चार वर्षाचा अर्थसंकल याचा लेखाजोखा मागणी करत चालू अर्थसंकल्पाकडे पाठ फिरवली. यामुळे हा अर्थसंकल्प नगरपरिषद सभागृहांमध्ये ना मंजूर ठरला हे अर्थसंकल्प नामंजूर होणे हे भूम शहराच्या विकासाला खीळ बसणे अशाच पद्धतीचे ठरले असते म्हणून आम्ही हा अर्थसंकल्प जिल्हाधिकारी यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवलेला आहे. तसेच काही सोशल मीडियाच्या माध्यमातून घरकुल हप्ते मिळून दिल्याचे सांगितले जात आहे. वास्तविक पाहता बहुतांशी लोकांचे पहिले हप्ते घरकुलाचे मिळाले होते. परंतु काही हप्ते निवडणूक आचारसंहिता असल्याने लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात न आल्याने वेळ लागला होता. परंतु आचारसंहिता संपतात लाभार्थ्यांच्या खात्यावरती रकमा जमा झाल्याने याचा श्रेय कोणी घेण्याचे कारणच नाही असेही त्यांनी सांगितले. 

यावेळी माजी नगराध्यक्ष संजय गाढवे  गटनेते सुरज गाढवे, नगरसेवक तोफिक कुरेशी, अभिजीत शेटे, रिमा शिंदे, भाग्यश्री माने, बालाजी अंधारे, रामकिसन बप्पा गव्हाणे, मुशीर शेख आदी उपस्थित होते.


नगराध्यक्ष संयोगिता संजय गाढवे पदग्रहण घेताना मी आपले राजकीय जोडे बाहेरच सोडून न. प.दालनात भूम शहराच्या व नागरिकांच्या हितासाठी कामे करू असे बोलले असताना कशा पद्धतीने विरोधक नगरसेवक जर विकासाच्या मुद्द्यावर एकत्र येत असतील तर आम्ही केव्हाही भूम शहराच्या विकासासाठी एक पाऊल मागे अथवा पुढे ठेवू.


गटनेते सुरज गाढवे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, विरोधकांचं शहराचा आणि नगरपालिकेचे वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला जात आहे नगरपालिकेत नागरिक आपल्या कामासाठी येत असतात परंतु विरोधक नगरसेवक हे तासनतास कर्मचाऱ्यांना ताटकळत बसून घेतात यामुळे नागरिकांची कामे याला दिरंगाई होत आहे आणि अर्थसंकल्पामध्ये चालू अर्थसंकल्पाला सोडून विनाकारण भलतेच मुद्दे घेऊन चर्चा करून गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला हे निश्चित भूम शहराच्या विकासाचे नुकसान ठरणार आहे.

 
Top