धाराशिव (प्रतिनिधी)- सोलापूर, धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांची जनावरे चोरणारी टोळी स्थानिक गुन्हा शाखेने जेरबंद केली आहे. या टोळीकडून 8 म्हशी, चोरीसाठी वापरले पिकअप वाहन आदीसह 12 लाख 15 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींनी धाराशिव जिल्हयातील एकूण 13 म्हशी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली असून पोलीस आरोपीचे अन्य साथीदारांचा व म्हशींचा शोध घेत आहेत.

दि 20.02.2026 रोजी मौजे लासोना शिवारातील एका शेतकऱ्याच्या 05 म्हशी चोरीस गेले बाबत पोलिस स्टेशन बेंबळी येथे अज्ञाताविरूध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. धाराशिव अशाच प्रकारचे जनावरे चोरीचे अनेक गुन्हे दाखल असल्याने पोलीस अधिक्षक रितू खोखर यांनी अशा प्रकारचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखा, धाराशिव यांना आदेशित केले होते. 

त्यानुसार सपोनि कासार व पथक यांना गोपनीय बातमीदाराकडून प्राप्त माहितीवरून नेकनूर जि. बीड येथील एक संशयित इसम व वाहन या चोरीचे परीसरात येवून गेला असल्याची माहिती मिळून आली. त्यांनी तात्काळ चंद्रकांत जगन्नाथ नन्नवरे, रा. नन्नवरे वस्ती, नेकनूर, ता. जि. बीड यास नेकनूर येथून ताब्यात घेवून त्याचेकडे चौकशी केली. त्याने दिलेल्या माहितीवरून त्याचा अन्य एक साथीदार शंकर सुरेश चव्हाण रा. ढोकी यास ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींनी यापुर्वीही येवती, लासोना, बेंबळी, कोंड, तुळजापूर, काटी सावरगाव, सांगवीमार्डी, सुरतगाव, माणकेश्वर, वैराग जि. सोलापूर, या ठिकाणावरून म्हशी चोरी केल्या असल्याची कबुली दिली आहे. 


यांनी केली कारवाई

सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक  रितू खोखर, अपर पोलीस अधिक्षक शफकत आमना धाराशिव यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहायक पोलिस निरीक्षक सुदर्शन कासार, पोह शौकत पठाण, पोह प्रकाश औताडे, पोह जावेद काझी, पोह फरहान पठाण, चापोह रत्नदिप डोंगरे, नागनाथ गुरव यांचे पथकाने केली आहे.


 
Top