तुळजापूर (प्रतिनिधी)-  महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आत्मा विभाग आणि महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‌‘श्री तुळजाभवानी कृषी महोत्सव 2026‌’चे  उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले.

यावेळी पालकमंत्री सरनाईक यांनी हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर सक्षम शेतीचा ध्यास हवामान बदल, वाढता उत्पादन खर्च आणि बदलती बाजारपेठ या आव्हानांना तोंड देण्यासाठी शेतकऱ्यांना सक्षम करणे हा महोत्सवाचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करून पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यांनी शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसोबत कृषी पर्यटनाचा स्वीकार करण्याचे आवाहन केले.

या सोहळ्यास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजकुमार मोरे, टाटा इन्स्टिट्यूटचे संचालक राक्षसे, तुळजापूर तहसीलदार अरविंद बोळंगे, उपजिल्हाधिकारी सागर नन्नावरे, आत्माचे प्रकल्प संचालक मिसाळ, उपविभागीय कृषी अधिकारी महादेव आसलकर यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी, तुळजापूर आबासाहेब देशमुख यांनी केले. यावेळी कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या 18 शेतकरी व शेतकरी गटांचा कुटुंबासह सत्कार करण्यात आला.  


तज्ज्ञांचे मार्गदर्शन

एआयद्वारे ऊस व्यवस्थापन पांडुरंग आवाड यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने ऊस उत्पादनवाढीचे मार्ग स्पष्ट केले. केळी लागवड तंत्रज्ञान: किरण डोके यांनी निर्यातक्षम केळी उत्पादनासाठी आधुनिक पद्धती सांगितल्या. रेशीम शेतीतील संधी: डॉ. चंद्रकांत लटपटे यांनी रेशीम उद्योगातील संधी व व्यवस्थापनावर मार्गदर्शन केले. बायोचार निर्मिती: विनायक पाटील यांनी जमिनीचा पोत सुधारण्यासाठी बायोचारचे महत्त्व पटवून दिले. महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी हजारो शेतकऱ्यांनी हजेरी लावली. विविध कृषी प्रदर्शने, आधुनिक अवजारे, स्टॉल्स आणि तांत्रिक माहिती पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.

 
Top