धाराशिव (प्रतिनिधी)- 1 मार्च 2026 रविवार रोजी धाराशिव येथील अक्षरवेल महिला साहित्य मंडळ जे सातत्याने साहित्य चळवळ चालवत आहे . या मंडळाच्या वतीने कविवर्य कुसुमाग्रज जयंती व मराठी भाषा गौरव दिनानिमित्त  विशाखा साहित्य संमेलन आयोजित केले जाते. वेगवेगळ्या साहित्यिक कार्यक्रमाच्या निमित्ताने मंडळ महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून देते. प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीचे संमेलन देखील मोठ्या थाटात होणार आहे. यासाठी संमेलनाध्यक्ष म्हणून जेष्ठ साहित्यिक चारोळीकर चंद्रशेखर गोखले व त्यांच्या अभिनेत्री ,गायिका पत्नी उमा गोखले प्रमुख उपस्थिती म्हणून येणार आहेत. तसेच अपूर्वाई प्रकाशनचे प्रकाशक, जेष्ठ पत्रकार, लेखक डॉ. रवींद्र चिंचोलकर हे देखील उपस्थित असणार आहेत. 

शहरातील बार्शी नाका येथील  स्वयंवर मंगल कार्यालयात सकाळी दहा वाजता  या कार्यक्रमाचे उद्घाटन होईल. अक्षरवेलच्या 40 कवित्रींच्या फुलांची नावे असलेल्या चारोळी संग्रहाचे प्रकाशन अध्यक्षांच्या हस्ते होणार आहे. धाराशिव मधील नागरिकांनी, महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनींनी चंगोच्या खुमासदार चारोळ्या आणि मार्गदर्शन ऐकण्यासाठी आवर्जून उपस्थित रहावे. अशी विनंती नगरवासीयांना अक्षरवेल महिला साहित्य मंडळांनी केली आहे.

 
Top